टेंभुर्णी परिसरातील शिक्षक कन्यांची वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.10
र्टेंभुर्णी ता.जाफराबाद येथील डॉ तेजस्विनी अरुण आहेर हिची सुरत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम. डी. डी जी ओ (स्त्रीरोगतज्ञ)साठी निवड झाली आहे.डॉ तेजस्विनी हिने एम.बी.बी.एस चे शिक्षण मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केलेले आहे. जाफराबाद येथील जिल्हा परिषद शिक्षक जितेंद्र मालवी आणि श्रीमती सोनटकर यांची कन्या डॉ. ऋचा हिची छत्रपती संभाजीनगर येथील डॉ हेडगेवार रुग्णालयात एम. डी. अँनस्थेशिया(भूलरोग तज्ञ) साठी निवड झाली आहे. गणेशपुर येथील धनगर वस्ती जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक भगवान खरात यांची कन्या डॉ प्राजक्ता खरात हिची छत्रपती संभाजीनगर येथील एन्डोवर्ड हॉस्पिटल येथे एम.डी डी.जी.ओ.(स्त्री रोग तज्ञ) साठी निवड झाली आहे.जिल्हा परिषद शिक्षक किशोर मरमट यांची कन्या डॉ योगिता हिची निवड मुंबई येथील वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी. पॅथॉलॉजीसाठी झाली आहे. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तर माध्यमिक शिक्षण देखील मराठी शाळेतून घेऊन यशाचे उच्च शिखर गाठणाऱ्या या शिक्षक कन्यांचे विस्तार अधिकारी जिनेंद्र काळे, रामकुमार खराडे,जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विनोद कळंबे यांच्यासह जाफराबाद तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.



