औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबिराचे 22 जुनला आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि. 20
इयत्ता दहावी व बारावीनंतर भविष्यातील शिक्षणाच्या तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखत, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण खात्यातील विविध योजनेसंबंधी माहितीबाबत जालना येथील चंदनझिरा परिसरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत युवाशक्ती करियर शिबिराचे आयोजन शनिवार दि.22 जुन 2024 रोजी सकाळी 9 वाजता करण्यात आले आहे. यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार असून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबिराचे उदघाटन जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व पालकांनी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबिरात सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्ष्ज्ञण संचालनालयाच्या निर्देशानूसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.22 जुन रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करियर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रोजगार व स्वयंरोजगारासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या बँक व वित्तीय संस्थांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.