केंद्र शासनाचे जलशक्ती अभियान केंद्रीय पथकाचा अभ्यास दौरा संपन्न
जालना/प्रतिनिधी,दि.18
केंद्र शासनाचे जलशक्ती अभियान केंद्रीय पथक जालना येथे दि. 15 ते 17 जुलै 2024 ला जालना जिल्ह्याच्या प्रथम अभ्यास दौऱ्यावर असताना त्यांनी अभियानाअंतर्गत झालेल्या विविध कामांची पाहणी केली. तसेच दि.16 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत जलशक्ती अभियान अंतर्गत झालेल्या कामांचे पथकासमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय नोडल अधिकारी श्रीकांत नामदेव, वैज्ञानिक तथा तांत्रिक अधिकारी प्रिती राऊत यांनी जालना प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या योजनांचे कौतुक केले.
अभियानाअंतर्गत झालेल्या विविध कामांची दि. 15 जुलै 2024 रोजी पाहणी पथकाने केली. यात दरेगाव येथील रिचार्ज शाफ्ट व सामनगाव येथे शेततळे, सिमेंट नाला बांध व कोल्हापुरी बंधारा, अंबड येथील पुरातन पुष्कर बारव ला भेट दिली. दि. 16 जुलै रोजी कौचलवाडी येथे पोणलोट समिती व गावक-यांशी चर्चा केली व जलसंधारण कामांमधिल महिलांच्या सहभागाचे कौतुक केले. तसेच दि. 17 जुलै 2024 रोजी अंहकार देऊळगाव येथील जलजीवन मिशन अंर्तगत पुर्ण करण्यात आलेल्या हर घर जल योजनेची पाहणी केली. तसेच जिल्हा जलसंधारण आराखडा तात्काळ तयार करण्याबाबत, जिल्ह्यातील पाणी साठ्यांची जिओ टॅगींग, पुरातन बारवांची दुरुस्ती, जन जागरुकता अभियान मधे जास्तीत जास्त महिलांचा समावेश करण्याबाबत सुचना दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार जालना, जिल्हा जलसंधारण अधिकारी आर.एच. झुरावत, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पदमाकर गायकवाड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिक्षक जी. आर. कापसे, कार्यकारी अभियंता विद्या कानडे, कृषी अभियंता प्रा. पी.व्ही. वासरे व इतर अधिकारी उपस्थित होते. असे जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.