pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

साईप्रसाद परीवाराच्या वतीने पळसा येथील सेवानिवृत्त भारतीय सैनिकाचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न

0 1 7 4 7 6

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.6

हदगांव तालुक्यातील सर्वाधिक पंचेविस हुन अधिक भारतीय सैनिक असलेल्या ग्रामदैवत बिरोबा महाराज पावनभुमी मौजे पळसा येथील भूमिपुत्र भारतीय सैनिक सुरेश बोडखे यांनी सीआरपीएफ मध्ये तेवीस वर्षे सेवा करीत नुकतेच सेवानिवृत्त झाले असल्याने नांदेड जिल्ह्यातील गरजुचा आशेचा किरण ठरलेल्या साईप्रसाद परीवाराच्या वतीने नेहमी प्रमाणे कोणताही चेहरा समोर न येता शनिवार सात एप्रील रोजी पळसा ता.हदगांव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सेवानिवृत्तीबद्दल समारंभ संपन्न झाला.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय मुरमुरे मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी उपस्थिती लावून देशसेवेचे महत्व सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर तहसीलदार विनोद गुडंमवार गटविकास अधिकारी यांनी निवडणूक बैठकीमुळे उपस्थित राहु शकलो नसल्याचे दुरध्वनी संपर्कातुन सांगत निरोप समारंभास शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचालन विकास कांबळे यांनी केले तर आभार सविता निमडगे यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवृती वानखेडे मानवाडीकर राजु पांडे हदगांवकर प्रभाकर दहिभाते सविता निमडगे यांनी परीश्रम घेतले.
यावेळी सरपंच आशाताई प्रभाकर धाडेराव,माजी सरपंच प्रतिनिधी रणजित कांबळे, सेवानिवृत्त भारतीय सैनिक सुर्यवंशी कवानकर शेख खय्युम बिट जमादार श्याम वडजे, राजु पांडे हदगांवकर निवृतीराव वानखेडे मानवाडीकर सटवाजी पवार जवळगावकर, गोपाल भाऊ मिश्रा, मुगाजी कांबळे, प्रकाश मुळे, नारायण घंगाळे ,भगवानराव मस्के ,परसराम वाणी, संतोबा जाधव ,हानवता निलेवार, भगवानराव भिसे ,कुबेरराव राठोड किन्हाळकर , नारायणराव धोंडबाराव मस्के, कोंडबाराव दवणे,शंकरराव मुळे शंकरराव कदम, गजानन पंजाबराव मस्के प्रकाश कदम बालाजी निलेवार दत्ता मस्के कमलबाई लेकुळे सुरेखा निमडगे ज्ञानेश्वर हाराळ गजानन गंगासागर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक मंडळी महीला उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 7 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे