जिल्हा परिषदेकडून कृषी औजारांसाठी आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि. 21
जालना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत जिल्हा परिषद उपकर योजना सन 2025-26 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर कृषी औजारे पुरविण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी औजारे मागणीसाठी संबंधित पंचायत समितीमध्ये दि.16 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी केले आहे.
कृषी औजारामध्ये ट्रॅक्टर चलित औजारात पेरणीयंत्र व पल्टी नांगर, रोटाव्हेटर आणि 50 एच.पी.पर्यंत ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी स्वत:च्या नावे सातबारा व वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपयांपर्यत असावे. असे कृषी विकास अधिकारी, जि.प. जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.



