pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या देण्यात याव्यात; मराठवाडा शिक्षक संघाची मागणी

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी, दि.22

भविष्य निर्वाह निधी पावत्या नसल्यामुळे आवश्यक बाबींसाठी या खात्यामधून रकमा काढण्यात राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे भविष्य निर्वाह निधीच्या प्रलंबित पावत्या देण्यात याव्यात अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधे दरमहा गुंतवणूक करत असतात. दरवर्षी कर्मचारी शिक्षकांच्या गुंतवणूकीचा हिशेब देणा-या पावत्या दिल्या जातात. मुलांची लग्ने, आजारपण व तत्सम कारणांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या खात्यामधून परतावा / नापरतावा पध्दतीने रक्कम उचलत असतात. परंतु गेली तीन वर्षांपासून राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी पावत्या देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आपल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात किती रक्कम जमा आहे याबद्दल राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी अनभिज्ञ आहेत. आवश्यक कारणांसाठी रक्कम काढण्यात त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांच्यामधे असंतोष आणि नाराजी निर्माण झाली आहे. याची दखल घेऊन राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या तीन वर्षांपासून प्रलंबित भविष्य निर्वाह निधी पावत्या देण्यात याव्यात अशी मागणी संघाचे मराठवाडा शिक्षक अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, कोषाध्यक्ष ए. बी. औताडे, उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, सदस्य प्रेमदास राठोड,आरेफ कुरेशी जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे, जिल्हा सचिव संजय येळवंते, मार्गदर्शक डॉ मारुती तेगमपुरे पुरुषोत्तम जुन्ने, गौतम बनसोडे, कार्याध्यक्ष एफ.वाय. सय्यद, कोषाध्यक्ष नारायण मुंढे, उपाध्यक्ष भीमाशंकर शिदे, जगन वाघमोडे सहसचिव दीपक शेरे, गणेश चव्हाण, प्रद्युम्न काकड, गणेश मेहेत्रे, युवा शहराध्यक्ष सोहम बोदवडे, सुधाकर डोईफोडे, महिला शहराध्यक्ष ज्योती पांगारकर, सदस्य तुकाराम पडघन, चरण बट्टेवार, अजित बारहाते, विजयकुमार खरात प्रसिद्धी प्रमुख हकीम पटेल, भगवान धनगे यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे