pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मार्गदर्शन शिबीर संपन्न

0 1 7 4 1 1

जालना/प्रतिनिधी,दि.30

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानूसार सोमवार दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना येथे Pre- Institution Mediation and Settlement (PIMS) in Commercial Dispute and Cyber Security या विषयावर मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.
मार्गदर्शन शिबीरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा न्यायाधीश किशोर जयस्वाल, आणि सायबर सुरक्षा विश्लेषक अॅड. स्वरदा कबनूरकर, हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस जिल्हा न्यायाधीश किशोर जयस्वाल यांनी Pre-Institution Mediation and Settlement (PIMS) in Commercial Dispute याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सायबर सुरक्षा विश्लेषक अँड स्वरदा कबनुरकर, यांनी सायबर सिक्युरिटी विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपण दैनंदिन जिवनात मोबाईल कसा हाताळला पाहिजे आणि हाताळतांनी घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी अगदी सोप्या शब्दात उपस्थितांना माहिती सांगितली. प्रत्येकाने मोबाईलमध्ये कोणते अॅप्लीकेशन मोबाईलमध्ये घेतले पाहिजे आणि त्याची परवानगी अॅक्सेस दिला पाहिजे याबद्दल त्यांनी सांगितले. आपण आपल्या मोबाईलमध्ये अँटी व्हायरस या अॅप्लीकेशनचा वापर केल्याने आपला मोबाईल हॅक होण्यापासुन सुरक्षित राहील. तसेच झोपतांना मोबाईल जवळ बाळगु नये आणि आवश्यकता नसल्यास मोबाईल नेट बंद करून ठेवावे असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हे सहायक लोक अभिरक्षक अँड यश लोसरवार, यांनी केले तन आभार हे अँड. पठाण यांनी मानले. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्‍दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे