स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या उन्हाळी शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद
पुणे/ आत्माराम ढेकळे,दि.21
पुणेः- येथील स्त्री शक्ती फाऊंडेशन व अध्यात्मिक गजानन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने योगगुरु अर्चना सोनार यांनी आॕनलाईन उन्हाळी शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात विविध विषयावर शिक्षण व मार्गदर्शन देण्यात आले.त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
दि.५ते१०मे२०२४पर्यंत “राज्यस्तरीय आॕनलाईन विनामुल्य उन्हाळी शिबिराचे(समर व्हेकेशन) आयोजन झुम अॕपवर करण्यात आले होते.या सहा दिवशीय शिबिराच्या प्रथमदिनी मुक्त पत्रकार आत्माराम ढेकळे व रुग्वेद सुवर्णवार्ता स्वर्णकार समाज प्रसार वाहिनीचे संचालक दिनेश येवले हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.या शिबिरात प्रामुख्याने शिवकालीन मर्दानी खेळ,भाषण कसे करावे,शाडुच्या मातीपासुन फळे व कुकर,आईस्क्रीमच्या काड्यापासुन शोपीस व ओरिगामी,मातीच्या क्ले पासुन विविध वस्तु तसेच गिटार,तबला,हार्मोनियमचे शिक्षण ,क्राफ्ट व डेकोरेशन ,रांगोळी,नृत्य शिक्षण आदी विषयांचा समावेश होता.या विषयानुसार प्रामुख्याने जान्हवी तुषार जाधव,ऋग्वेद दिनेश येवले,प्रीतीका मंडल,मुग्धा कुलकर्णी ,समर्थ बचाराम कर्णे,सार्थक बचाराम कर्णे,ओवी कुलकर्णी ,श्रेया राहुल सावंत,मयुरी प्रशांत जोशी,आर्या निलेश कुलकर्णी ,आरोही विनोद पाटील ,वैदेही विनोद पाटील ,ऋतुजा ज्ञानेश्वर मुगवानकर,स्वरा सुहास दुसाने आणि सर्वज्ञ दत्तात्रय कोरडे या सर्व मुलांनी प्रशिक्षक म्हणुन सर्व विद्यार्थ्यांना शिकविले .तर परीक्षक म्हणून श्रीमती विमलताई काजळे,सौ.दिपालीताई भांडेकर,सौ.जयश्री अवतारे,सौ.श्रुती देसाई,सौ.दर्शना नितीन बागुल व सौ.रेखा पालकर यांनी काम पाहिले.या शिबिरात महाराष्ट्र ,गुजरात ,राजस्थान या प्रदेशातील सुमारे ३७८ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.शिबिराचे संपुर्ण निवेदन/संचलन आणि आयोजन स्त्री शक्ती फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ.अर्चना ईश्वर सोनार यांनी केले.या शिबिराचे कौतुक सहभागी अतिथी व परीक्षकांनी आपल्या मनोगतातुन केले.या राज्यस्तरीय समर व्हेकेशन कॕम्प मध्ये परीक्षक आणि प्रशिक्षक म्हणुन कार्य केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.