ब्रेकिंग
आदित्य अनंत घरत याची ‘आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धेत चमकदार कामगिरी

0
3
1
0
9
5
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3
सुरतमध्ये आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२५ ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत भारताचे प्रतिनीधीत्व करत आदित्य घरत याने फुल पॉवरलिफ्टिंग, पुशपुल, डेडलिफ्ट आणि बेंचप्रेस या चारही गटात गोल्ड मेडल पटकावले. त्याच्या या चमकदार कामगिरीमुळे उरण तालुक्यासह रायगड जिल्ह्याला नावलौकिक मिळाले आहे. दरम्यान आदित्य अंकित घरतने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या पनवेल येथील निवासस्थानी भेट घेऊन आर्शिवाद घेतले.तसेच शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते जे.एम.म्हात्रे,बाळाराम पाटील, युवा नेते प्रितम म्हात्रे यांची भेट घेउन त्यांचे शुभाशीर्वाद घेतले.आदित्य घरत याने गोल्ड मेडल पटकविल्याने त्याच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0
3
1
0
9
5