वारकरी दिंडीत’महिला विकास समिती’चा सहभाग व सेवा

वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,दि.17
पुणेः- दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील देहु ते पंढरपुर कडे जाणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोबत दिंडी क्रं.१५९ ह.भ.प.अर्जुनराव तुकाराम देशमुख यांच्या दिंडी क्रं.७ मध्ये पिंपरी -चिंचवड ,पुणे येथील स्त्री शक्ती फाऊंडेशन संचलित महिला विकास समितीच्या पदाधिकारी महिला सहभागी होऊन टाळ्यांच्या गजरात ज्ञानेश्वर तुकाराम विठ्ठलांचा नामघोष करीत त्यांनी आनंद व्यक्त केला.डोक्यावर तुळशी वृदांवन व विठ्ठल -रुक्मिणीची मुर्ती घेऊन हरिनामाचा जप करत देहु ते भक्ती शक्ती (निगडी)असे सुमारे तेरा किलोमीटर पायी चालण्याचा योग आल्याबद्दल सर्व महिलांनी समाधान व्यक्त केले.या दरम्यान दिंडीत सामील वारकरी यांना सर्व प्रकारचे बिस्कीट,शेंगदाणा व राजगिरा चिक्की यांचे वाटप देखील करण्यात आले. यामध्ये स्त्री शक्ती फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सौ.अर्चना सोनार व महिला विकास समितीच्या पदाधिकारी सौ.दर्शना शेट्टी,सौ.सुप्रिया देसाई,सौ.शितल मंदानेकर,सौ.ज्योती जोशी,सौ.वैशाली सानप,सौ.वंदना कांबळे,सौ.आरती जोशी,सौ.सुलक्षणा नाथ,सौ.नीता डोंगरे,श्रीमती अंजली कांदेकर,सौ.संगीता काळोखे,सौ.मनिषा मोटे,सौ.सुहासिनी वेर्णेकर आदी भाविक महिलांनी उत्साहाने सहभाग घेऊन सेवा दिली.