pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

घनश्याम पाटील यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

0 1 7 4 0 5

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.2

उरण तालुक्यातील नामवंत अशा जनरल एज्यूकेशन इन्स्टिट्यूटचे नेटिव्ह इन्स्टिटयूट्यूशन व ज्यूनियर कॉलेज कॉर्मसचे मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक घनश्याम पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ सोहळा शनिवार दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता एन. आय.हायस्कूल उरण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष सदानंद गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून जनरल एज्यूकेशन इन्स्टिटयूट दादरचे संचालक गजानन केणे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक बागुल सर,शालेय समिती सदस्य शशिकांत पाटील,माजी चेअरमन महेश म्हात्रे,एडवोकेट मनोहर पाटील, एडवोकेट सुप्रिया पाटील,पनवेल नगरपालिकेचे नगरसेवक गणेश कडू, नातेवाईक व मित्रपरिवार, गो. ना. आक्षीकर विद्या संकुलातील मुख्याध्यापक, पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग, माजी विद्यार्थी संतोष परदेशी, सारेगमपचे पहिले विजेते झी म्यूजिक चे अवॉर्ड विजेती पुनम कोरगावकर,संतोष कोरगावकर, शाळेचे विद्यार्थी आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

मुख्याध्यापक घनश्याम पाटील यांनी आपल्या मनोगतातून आपल्या प्रदीर्घ सेवेत आलेले वेगवेगळे चांगले वाईट अनुभव सांगितले. जीवनातील विविध आठवणींना त्यांनी उजाळा दिल्या. विद्यार्थ्यांनी हिंमत न हारता आलेल्या संकटाशी दोन हात करत शिक्षण घ्यावे, उच्च शिक्षण घेउन, चांगले संस्कार घेउन देशाचे नाव उज्वल करा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. यावेळी त्यांनी सर्वांचे, उपस्थितांचे आभार मानले.हा सेवानिवृत्त समारंभ सोहळा कायमस्वरूपी आठवणीत राहिल असे त्यांनी सांगितले.प्रदिर्घ सेवे नंतर सेवानिवृत्त होत असल्याने विद्यार्थी शिक्षक कर्मचा-यांनी घनश्याम पाटील सरांनी ईथेच शाळेत राहून काम करावे अशी इच्छा व्यक्त केली. घनश्याम पाटील यांनी आपल्या प्रदिर्घ सेवेतून हजारो विद्यार्थी, गुणवान विद्यार्थी घडविले, मुलांना चांगले संस्कार दिले. त्यामुळे ते विद्यार्थी पालक व शिक्षकांनाही हवेहवेसे वाटतात. मात्र सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असल्याने मुख्याध्यापक घनश्याम पाटील यांना सर्वांनी जड अंतकरणाने निरोप दिला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे