तपोवन गोंधन येथे एक्स-रे कॅम्प, ५० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.13
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील तपोवन गोंधन येथे क्षयरोग मोहिमेअंतर्गत एक्स-रे कॅम्पचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. सध्या महाराष्ट्र शासनातर्फे आरोग्याच्या दिशेने ठोस पाऊल-क्षयरोगमुक्त महाराष्ट्र हा उपक्रम राबविला जात आहे.
या अंतर्गत आरोग्य विभागातर्फे ठिकठिकाणी क्षयरोगाबाबत जनजागृती करून त्याच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न केले जात आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव व आरोग्य उपकेंद्र तोंडोळी अंतर्गत आयोजित या एक्स-रे कॅम्पमध्ये ५० पेक्षा अधिक रुग्णांचे एक्स-रे काढण्यात आले आहेत.
यावेळी सीएचओ डॉ. मयूर डोमळे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना येथून आलेल्या पथकातील एक्स-रे टेक्निशियन राजू पवार, श्रवण कांबळे, ज्ञानेश्वर खजाने, कमलेश देशमुख, परिचारिका सविता शिराळे, एमपीडब्ल्यू व्ही. व्ही. घायाळ, व्ही. ई. कव्हळे, आशा वर्कर शशिकला फलके, आदींनी या उपक्रमात पुढाकार घेतला. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.
१२ नोव्हेंबर रोजी तपोवन गोंधन येथे एक्स-रे-कॅम्प उत्साहात.
तपोवन गोंधन येथे एक्स-रे कॅम्प अंतर्गत रुग्णांची तपासणी करताना विशेष पथक.
66
नागरिकांनी हा आजार न लपवता त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावे. याबाबत शासनाने सर्व औषधी व उपचार पीएचसी स्तरावर उपलब्ध करुन दिल्या आहेत.
डॉ. संदीप ढसाळ, वै. अधिकारी, डोणगाव केंद्र.
66
सध्या महाराष्ट्र शासनाच्या क्षयरोगमुक्त महाराष्ट्र या महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतर्गत ग्रामीण भागातही एक्स-रे सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आयोजित अशा कॅम्पमधून खोकला असणाऱ्या रुग्णांचे एक्स-रे काढले जात आहे. हा रोग पूर्णतः बरा होतो.
डॉ. जयश्री भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना.

