ब्रेकिंग
माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ‘इनव्हिक्टा’ कार्यालयाचे उदघाटन

0
3
1
4
8
3
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24
‘इनव्हिक्टा’ या बांधकाम क्षेत्रातील नावाजलेल्या कंपनीच्या सुसज्ज आणि देखण्या सेल्स कार्यालयाचे उदघाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (ता. २३) उलवे नोडमध्ये सेक्टर २६ येथे झाले. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रकल्पाची त्यांनी इत्थंभूत माहिती घेतली आणि कामाचे कौतुक केले. बांधकाम व्यावसायिक ॲड. संतोष पाटील, गोविंद गजोरा, दिपेश गजोरा यांना महेंद्रशेठ घरत यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी अरुणशेठ भगत, रतनशेठ भगत, अनिल भगत, कुणाल घरत, श्रीधरशेठ भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
0
3
1
4
8
3