आमदार जवळगावकर यांची बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.10
शवविच्छेदन केंद्राच्या कामास प्राधान्य देण्याची केली सुचना
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर अती संवेदनशील असलेल्या बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील एक वर्षांपासून नव्याने आलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.जी.भिसे व डॉ. के.सी.बरगे यांनी कमी कर्मचा-यावर कुटुंब शस्त्रक्रियेसह विविध सेवेत जिल्ह्यात नावलौकीक कामगिरी केली आहे. ओपीडी वाढल्याने कार्यक्षेत्रातील रुंग्णाना अनुभव फायदेशीर ठरला असून सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
शवविच्छेदन केंद्र ईमारत असताना साहित्य अभावी अद्याप उपयोगात आणले नसल्याने शवविच्छेदनासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने सामाजिक कार्यकर्त्या सवीताताई विनोद निमडगे पळसेकर यांनी आमदार जवळगावकर यांच्यासह प्रशासनाकडे रिक्त पदासह शवविच्छेदन केंद्र चालु करण्याची मागणी केली होती.
आमदार जवळगावकर यांनी रविवार दहा सप्टेंबर रोजी बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन चालु असलेल्या विविध कामाची पाहणी केली.आरोग्य केंद्रातील कमी कर्मचा-यावर आरोग्य सेवेतील विविध कामासह परिसरातील स्वच्छतेविषयी समाधान व्यक्त करीत रिक्त पदाबाबत वरिष्ठाना आवश्यक सुचना केली असून लवकरच रिक्त पदे भरण्यात येतील असे सांगितले. आमदार जवळगावकर यांच्या माध्यमातून बरडशेवाळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध सुरु असलेल्या कामात संबधित ठेकेदाराला अगोदर शवविच्छेदन केंद्राच्या कामास प्राधान्य देण्याची सुचना केली. गेल्या काही वर्षांपासून असलेला शवविच्छेदनाचा प्रश्न अनुभवी वैद्यकीय अधिकारी असल्याने व आता आवश्यक साहित्याचा प्रश्न सुटला असल्याने शवविच्छेदनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याने कार्यक्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी काँग्रेस कमिटी माजी तालुका अध्यक्ष आनंदराव भंडारे. वैद्यकीय अधिकारी एस.जी.भिसे. वैद्यकीय अधिकारी के.सी.बरगे.बरडशेवाळा सरपंच मस्के, पोलीस पाटील दत्तात्रय मस्के,सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर दहीभाते, विकासराव राठोड पांगरीकर, कदम लिंबगावकर आनंदराव मस्के.सवीताताई विनोद निमडगे पळसेकर, गगांधर जमदाडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.