जालना शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याचे व परिसराचे तात्काळ सुशोभीकरण करावे – सौ संध्या संजय देठे

जालना/प्रतिनिधी, दि.3
जालना शहरात विविध ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बसविले आहे परंतु जालना शहर महानगरपालिकेचे या पुतळ्यांकडे दुर्लक्ष झालेले आहे. म्हणून जालना शहरातील सर्व महापुरुषांची पुतळे यांची सर्वेक्षण करून त्या बाजूतील परिसर चौक सुशोभीकरण करावे
जेणेकरून सर्व पुतळ्यांचा सन्मान राखला जाईल
तसेच जालना शहरातील विविध रस्त्यांवर मधोमध महावितरण विद्युत कंपनीचे पोल उभे आहे त्यामुळे मोठ्या दुर्घटना होऊन अपघात होत आहे म्हणून ते पोल तात्काळ हटवण्यात यावे
येणाऱ्या काळात सर्व असल्याने विशेष स्वच्छता मोहीम राबवून फवारणी करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन माननीय जालना शहर महानगरपालिका आयुक्त यांना सौ देठे यांनी दिले आहे.
—————————————————–
तात्काळ जालना शहरातील सर्व पुतळे व स्मारक यांची सर्वेक्षण करून सुशोभीकरण देखभाल दुरुस्ती मोहीम हाती घेऊन स्मारक पुतळे सुशोभीकरण करण्यात येईल अशी आश्वासन आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी दिले