pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

काद्राबाद परिसरात महापालिकेकडून पाणी पुरवठा होईना,पाणी पुरवठा वेळेवर सोडण्याची मागणी

-काद्राबाद परिसरात पाणी वेळेवर सोडवा नसता शिवसेना रस्त्यावर उतरेल - शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले यांचा इशारा -महापालिकेला शहर शिवसेनेचे निवेदन

0 3 2 1 7 2
जालना/प्रतिनिधी,दि.15
जालना शहरातील काद्राबाद परिसरात २२-२२ दिवस
महानगर पालिकेकडून पाणी पुरवठा करण्यात येत नसल्याने येथील रहिवाश्यांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे काद्राबाद परिसराला वेळेवर पाणी सोडण्यात यावा नसता शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा
इशार्‍याचे निवेदन शिवसेना शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले यांनी महापालिकेच्या सहआयुक्त यांना दिले आहे. आज शहर शिवसेनेचे शिष्टमंडळाने
महापालिकेच्या आयुक्ताची भेट घेवून निवेदन दिले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव पवार,शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोठीवाले आदींच्या शिष्टमंडळाने महापालिकेच्या प्रशासनातील अधिकार्‍यांची भेट घेवून पाण्यासंदर्भात जाब विचारला. तसेच जालना शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेला काद्राबाद विभागाला गेल्या २० ते२२ दिवसांपासून नळाला पाणी येत नाही. कर्मचारी व अधिकार्‍यांना वारंवार संपर्क करुनही नळाला पाणी येत नाही. नळाला जर पाणी आले तर दुषित पाणी येते,त्यामुळे रोगराईची भिती निर्माण झाली आहे.  तसेच वेळेवर पाणी
येत नसल्याने याचा सामान्य जनतेला यांचा त्रास होत असून गरीब व होतकरु लोकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. तरी वर्षाला २ हजार ७०० रुपये पाणी
पट्टी करुन ही पाणी वेळेवर सोडले जात नाही. तरी पाणी पुरवठा अधिकारी यांनी काद्राबाद विभागाला पाणी सोडण्याचे आदेश द्यावे नसता शिवसेना स्टाईलने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाव्दारे दिला आहे.या निवेदनावर शहरप्रमुख शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले,
दुर्गेश काठोठीवाले, शांतीलाल गादिया, कमलाबाई संडूपटला, बजरंग राजपुत,पंडीत खैरे, आकाश गादिया, मंदाताई मिसाळ, सोपान दुसाने, माधवी गुप्ता,
सिंधूताई चव्हाण, शोभा मिटकर, प्रकाश पवार, रवि नवघरे, सुनिल नंद, नारायण मालोदे, मयुर धोत्रे, अभिमन्यु काठोठीवाले, तुषार मेघवाले, रवि नेवासेकर
आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.नसता रस्त्यावर उतरु – काठोठीवाले काद्राबाद परिसरात  पाणी सोडवावा अशी मागणी वारंवार महापालिकेच्या अधिकार्‍यांकडे करण्यात येते. परंतु अधिकारी व कर्मचार्‍यांना धाक नसल्याने ते पाणी सोडण्यास टाळाळाळ करतात. या प्रकारला धडा शिकविण्यासाठी शिवसेना स्टाईलने आंदोलन करुन रस्त्यावर उतरु, असा इशाराही शहरप्रमुख
दुर्गेश काठोठीवाले यांनी दिला आहे. तर महापालिकेचे सहायक आयुक्त यांनी उद्याच पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे