pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेला 3 ऑगस्टपासून प्रारंभ

0 1 2 1 0 6

जालना/प्रतिनिधी,दि. 2 

महाराष्ट्र शासनाच्या, क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद,व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्ममाने आयोजित जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2023-24 चे आयोजन दि. 3 ते 5 ऑगस्ट या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात येणार आहे.

वयोगट 14 व 17 वर्षाच्या आतील मुलांची व मुलींची दि. 3 ऑगस्ट 2023 रोजी तसेच वयोगट 17 वर्षाच्या आतील मुलांची दि. 4 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल जालना येथे स्पर्धा असेल.

62 वी आंतरराष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धा माहे स्पटेंबर 2023 मध्ये होणार आहे. त्यासाठी विविध स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा 2023-24 मध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी/खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा.

या स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंसाठी जन्म तारेखेनुसार वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे.

14 वर्षाच्या आतील मुलांसाठी (सब ज्युनिअर) दि. 1 जानेवारी 2010 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
17 वर्षाच्या आतील मुलांसाठी व मुलींसाठी (ज्युनिअर) दि. 1 जानेवारी 2007 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडुकडे जन्म दाखला/आधार कार्ड/पासपोर्ट (मुळ प्रतीत) असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक महमंद शेख, 8788360313, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे 7588169493, क्रीडा अधिकारी रेखा परदेशी 9022951924 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 0 6