जालना जिल्ह्यात पहिल्यांदा समृद्धी साखर कारखान्यामार्फत सतीश घाटगे यांनी रांजणी येथे आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीस बैलगाडा प्रेमींचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. ही भव्य दिव्य स्पर्धा सर्वाना वेगळा आनंद देऊन गेली. सहभागी प्रत्येक धुरकरी आणि बैलगाडा मालकांनी प्रेक्षकांची मने जिकंली. या स्पर्धेतील विजेत्या बैलगाडा मालक व धुरकरी यांचा सतीश घाटगे यांच्या हस्ते सन्मान करून बक्षीस वितरण करण्यात आले.
राज्यभरातील 110 नावाजलेल्या बैलजोडी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. दोन दिवस ही स्पर्धा रंगातदार ठरली. ग्रामीण संकृतीचे दर्शन घडविणाऱ्या शंकरपटाचा थरार आणि रोमांचकारी शर्यतीचा आनंद या स्पर्धेमुळे बैलगाडा प्रेमींना अनुभवता आला. या स्पर्धेतील नंबर एकचे बक्षीस किनगाव राजा येथील #लखन आणि #दुर्गा या बैलजोडीने पटकावले. ५.८५ मिली सेकंदात या जोडीने मैदान सर करून आपल्या धन्यासाठी रांजणी केसरीचा मान पटकावला. त्यांना बक्षीस म्हणून समृद्धी कारखान्यामार्फत दुचाकी भेट देण्यात आली. तसेच दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस कानफोडी येथील #महाराजा_तुफान या बैलजोडीने पटकावले तर तिसरे बक्षीस #शंकर_डायमंड या जोडीने मिळविले. दोन्ही बैलजोडी मालकांना स्कुटी बक्षीस देण्यात आली.
या स्पर्धेत खऱ्या अर्थाने घडीवाले रणजित राठोड यांनी रंगत आणली. आपल्या बहारदार समालोचनाने त्यांनी मने जिंकली सोबत स्पर्धेतील प्रत्येक बैलजोडीचा टायमिंग अचूकपणे टीपण्याचे काम त्यांनी केले. रांजणी येथील आफरोज भाई तांबोली मित्र मंडळ, अशफाक पठाण, आमेर कुरेशी, सलमान भैय्या तांबोली, शेख सलाम, बबलू तांबोली, रमेश मोरे, शाम लगामे, रोहीत दाभाडे, अतीक तांबोली यांचे उत्कृष्ट नियोजना बद्दल घाटगे साहेबांनी कौतुक केले.