अनुसूचित जाती जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींसाठी निवासी प्रशिक्षणाचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि. 5
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती नव उद्योजकांसाठी विशेष सामूहिक प्रोत्साहन योजना कार्यान्वित आहे. वर्ष 2024- 25 साठी निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत मराठवाडा विभागामध्ये 320 नवउद्योजकांना निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम व तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन विभागीय स्तरावर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात आले आहे. तरी प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये जालना जिल्ह्यातून 20 लाभार्थींना गुरुवार दि. 6 मार्च 2025 रोजी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करून निवासी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे.
तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत 1) सीएनसी मशीनिंग(अनुसूचित जाती प्रवर्ग) 2)थ्रीडी प्रिंटिंग अँड रिव्हर्स इंजीनियरिंग (अनुसूचित जाती प्रवर्ग) 3) फूड अँड प्रोसेसिंग (अनुसूचित जमाती प्रवर्ग) 4)सोलर पीव्ही टेक्निशियन (अनुसूचित जमाती प्रवर्ग) इत्यादी टेक्निकल प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात आले आहेत. प्रशिक्षण कार्यक्रम हा दि. 17 मार्च 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधी दरम्यान महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मुख्य कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 45 दिवसाचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दि. 6 मार्च 2025 असून त्याच दिवशी दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 6 मार्च 2025 असून याच दिवशी दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये प्रवेश अर्ज भरलेल्या लाभार्थींची प्रत्यक्ष मुलाखती महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा- मराठा बिल्डींग (पार्क), विशाल कॉर्नर छत्रपती संभाजीनगर चौफुली, जालना या ठिकाणी निवड करण्यात येणार आहे. असे प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.