pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सेवा भारतीच्या वतीने आद्यक्रांती गुरु लहुजी साळवे पुण्यतिथीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिर

0 3 2 6 6 6

जितेंद्र गाडेकर, जालना,दि.18

सेवा भारती, देवगिरी -कर्मयोगी सेवाभावी संस्था जि. जालना व निरामय हाॅस्पीटल च्या सहयोगातुन शास्त्री मोहल्ला संजय नगर येथील अण्णा भाऊ साठे समाज मंदिरात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात साई पॅथाॅलाॅजीचे श्री. कदम यांचे द्वारा Hb तपासणी तसेच जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने सर्व रुग्णांचे रक्त गट तपासणी घेण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक डॉ नितीनजी खंडेलवाल, निरामय हॉस्पिटलचे प्रमुख मार्गदर्शक डॉ पद्माकर सबनीस सर ,प्रमुख पाहुणे राजेंद्र भोसले,गायकवाड ताई,यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सुरेशजी मगरे व देवा कांबळे,गायकवाड साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक सुनील जोशी यांनी केले, तर सुरेश इच्चे यांनी आभार मानले. सेवा भारती सचिव शरद खोत, सहसचिव सुरेश ईच्चे, सहकोषाध्यक्ष दिलीप सराफ,शाम वांगे,ललित शिंदे,श्री गायकवाड ,देवा कांबळे यांनी शिबिराकरीता नियोजन व परीश्रम केले. साई पॅथॉलॉजीचे कैलासजी कदम यांनी महिलांची Hb तपासणी केली तर जनकल्याण रक्तपेढीचे सरीता खंदारे व विक्रम पुंगळे यांनी रक्त गट तपासणी केली. निरामय हॉस्पिटल डॉ.सबनिस,डॉ.निखिल परीतकर, डॉ.आनंद मुर्तुडकर , देवा ढाकणे यांनी आरोग्य तपासणी करुन औषध वितरण आरोग्य आयाम प्रमुख संदिप देशपांडे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 6 6 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे