माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांचा करिष्मा
एका दिवसात भाजपमध्ये गेलेले खानावले सरपंच व कार्यकर्त्यांची केली घर वापसी.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14
उरण विधानसभेतील पनवेल तालुक्यातील शिवसेनेच्या खानावले ग्रामपंचायत सरपंच जयश्री सुभाष नाईक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी फसवणूक करून व पैशाचा आमिष दाखवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून घेतला होता, परंतु त्यांनी दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मनोहरशेठ भोईर यांनी पुढाकार घेउन घर वापसी केली.यावेळी मनोहरशेठ भोईर यांचा करिष्मा पुन्हा एकदा सर्वांना पाहावयास मिळाला.यावेळी माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर,पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ मंगल पाटील यांनी या सर्व कार्यकर्त्यांना भगवी शाल अर्पण करून त्यांचे पुन्हा एकदा शिवसेनेत स्वागत केले.
सदर वेळी माजी सरपंच तसेच विद्यमान सदस्य व गुलसुंदा जिल्हा परिषद संपर्कप्रमुख मोहन लबडे, सरपंच पोयंजे, पनवेल उपतालुका प्रमुख जगदीश मते, ग्रामपंचायत सदस्य संतोष लबडे, सदस्य रघुनाथ सोनवणे,युवा नेते अविनाश मांडे, पांडुरंग पाटील व आदिवासी बांधव उपस्थित होते.