मोर्शी येथील शिवाजी हायस्कूल उद्योजकांद्वारे व्यवसाय मार्गदर्शन

मोर्शी /त्रिफुल ढेवले,दि.19
मोर्शी : शासकीय धोरणानुसार १४ ते २१ फेब्रुवारी हा आठवडा व्यवसाय मार्गदर्शन सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने सोमवारी शिवाजी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला मोर्शी येथील युवा उद्योजक नवीनकुमार पेठे, युवा उद्योजक प्रफुल्ल हेलोडे, आनंद बारबुद्धे यांना विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले होते. या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक मिलिंद ढाकुलकर, उपमुख्याध्यापक रवींद्र जावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. युवा उद्योजक नवीन कुमार यांनी पेठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या पारंपरिक व्यवसायातून सुद्धा यशाचा मार्ग शोधता येतो व व्यवसाय करून मनुष्य कसा मोठा होऊ शकतो, या बद्दल मार्गदर्शन केले. तसेच प्रफुल्ल हेलोडे यांनी अगदी तुटपुंज्या भांडवलातून त्यांनी कशाप्रकारे अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. कशाप्रकारे आपला व्यवसाय मोठा केला, याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच नुकतेच नेदरलँड येथून शिक्षण घेऊन परतलेले तसेच मोठी नोकरी सोडून आपल्या देशात परत येऊन कशाप्रकारे उद्योग सुरू करून प्रगती केली याबद्दल आनंद बारबुद्धे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर कसे बनले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला तंत्रशाखा प्रमुख दिलीप कानडे, राजेश मुंगसे, संजय ब्राम्हणे, संदीप दंडाळे, विजय तारापुरे, सारंग जाणे, विशाखा ठाकरे, योगेंद्र खोडे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रेमा नवरे यांनी केले, तर आभार दिलीप कानडे यांनी मानले.