काँग्रेसचे निरीक्षक राजेश शर्मा यांचा लवकरच रायगड जिल्हा दौरा

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या आदेशावरून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांची रायगड जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील सर्व ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, नेते मंडळी, पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल सर्व सेलचे पदाधिकारी यांच्याशी निरीक्षक राजेश शर्मा विविध विषयावर चर्चा करतील या संदर्भात ब्लॉक निहाय बैठकीचे नियोजन करण्यात येत असून निरीक्षक यांचा जिल्हा दौरा व बैठकांच्या तारखा तपशील पदाधिकारी कार्यकर्त्यांना लवकरच कळविण्यात येईल. या दौरा निमित्त निरीक्षक यांचे स्वागत करण्यासाठी व विविध विषया संदर्भात बैठकीसाठी रायगड जिल्ह्यातील सर्व ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, नेते मंडळी, पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल सर्व सेलचे पदाधिकारी यांनी मोठया प्रमाणात हजर राहावे असे आवाहन महेंद्रशेठ घरत अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस यांनी केले आहे.