स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध
जालना/प्रतिनिधी,दि.7
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 साठी दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. जालना जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या नगरपरिषदांच्या निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या कार्यकर्ते व हितचिंतकाने, मुद्रणालयाचे मालकाने व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापताना इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे. नमुना मतपत्रिकेसाठी मा.निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे. मा.निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध आदर्श आचारसंहिता संपेपर्यंत घालण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तमल यांनी जारी केले आहेत.

