pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

 काजळा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

0 1 7 3 7 7

काजळा/प्रतिनिधी, दि.19

हिंदू व मुस्लीमसह  सर्व जाती धर्माचे लोक एकमेकांचे सण मोठ्या आनंदाने साजरे करतात व बंधुभावाचा संदेश देत असतात.बदनापूर तालुक्यातील काजळा येथील मुस्लीम समाजातर्फे रमजानचा उपवास केल्याने गट ग्रामपंचायत, काजळा-पानखेडा व वि.वि.का.सेवा सोसायटी व ग्रामस्थांच्या वतीने रमजानचे उपवास करणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी आज रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

बदनापूर तालुक्यातील काजळा गावात ग्रामपंचायतीने रोजे करणाऱ्या बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी मशिदीचे हाफीज साहेब यांनी नमाज पठण करून उपवास सोडला. यावेळी सरपंच रंगनाथ देवकाते, बदनापुर पंचायत समितीचे माजी सभापतीआणि वि.वि.का.सेवा सोसायटीचे चेअरमन रघुनाथराव भोर्डे, पोलिस पाटील लक्ष्मणराव पा. पैठणे, माजी उपसरपंच गोरख अप्पा शिंदे, कुणबी युवा मंच संस्थापक अध्यक्ष  ऍड राम कुऱ्हाडे, भागवत घाटे, सोसायटी सदस्य भगवानराव कोळेकर, दामोधर अण्णा कोळेकर, ग्रा.पं. सदस्य कैलास खंडेकर, मनोहर जाधव, ज्ञानेश्वर बोबडे,सोबत बाबासाहेब भोर्डे, धनंजय गरड यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे