pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

समृध्दी महामार्गावरील जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानची वाहतूक तीन दिवस काही तासांसाठी वळविली

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी,दि. 30

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजुची वाहतूक दि.31 ऑक्टोबर ते दि.2 नोव्हेंबर 2023 या कालावधीत प्रत्येक दिवशी दुपारी 12 ते दुपारी 3.30 या वेळेत पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरच्या कामासाठी बंद करण्यात येणार आहे, तरी या दिवशी इतर वेळेत याभागातील समृध्दी महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे चालू राहील. असे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता तथा प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी दिली.
समृध्दी महामार्गावरील जालना इंटरचेंज (IC-१४) ते सावंगी इंटरचेंज (१०-१६) दरम्यान समृध्दी महामार्गवरुन नागपूरकडुन मुंबईकडे जाणारी वाहतूक, “निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-१४ मधुन बाहेर पडुन निधोना एमआयडीसी मार्गे राष्ट्रीय महामार्ग ७५३ A (जालना – छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत – नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. IC-१६ (छत्रपती संभाजीनगर)” येथे समृध्दी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे रवाना होईल.
समृध्दी महामार्गावरील शिर्डीकडुन नागपूरकडे जाणारी वाहतूक, “सावंगी इंटरचेंज क्र. IC-१६ (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडुन वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुध्द दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-१४” या ठिकाणी समृध्दी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे