pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0 1 2 1 1 2

मुंबई, दि.6

पुणे जिल्ह्यातील लोहगाव परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लोहगाव येथील सहा एकर जागेत १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थानांचे बांधकाम करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
पुणे जिल्ह्याच्या लोहगाव (ता. हवेली) येथील उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थान बांधकामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आज घेतला. बैठकीस आमदार सुनील टिंगरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, पुण्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून लोहगाव परिसरातील जनतेला आरोग्यसेवा पुरविण्यात येणार आहेत. रुग्णालयाचे बांधकाम, आतील साधनसामुग्री इतर सोयीसुविधा, रुग्णांवर उपचारासाठी साधने, आरोग्य यंत्रणा, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2