शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17
केंद्रीयमंत्री पदाचा दुरुपयोग करून अतिशय खालच्या पातळीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांचा शिवसेना उरण तालुका व शहराच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते, परंतु सध्याच्या सरकारने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर जाणून बुजून पोलिस कारवाई व कोर्टाची कारवाई केली होती, या निषेध आंदोलनाचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, गटनेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विनोद म्हात्रे, नगरसेवक अतुल ठाकूर, युवासेना विधानसभा अध्यक्ष ऍड नितेश पाटील, उपतालुका संघटक रुपेश पाटील, व विभागप्रमुख एस के पुरो यांच्यावर करून कलम भा द विकायदा २६९, २७०, १८८, महा पो नि ३७(१) सी १३५ नुसार कायदेशीर कारवाई व आंदोलनात मास्क न वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
मंगळवार दिनांक १६ जानेवारी २०२४ रोजी उरण कनिष्ठ न्यायालयाने या सर्व पदाधिकारी यांना निर्दोष मुक्तता केली आहे यावेळी ॲड. निनाद नाईक आणि ॲड. प्रशांत पाटील यांनी शिवसेना पदाधिकारी यांची कोर्टामध्ये खंबीरपणे व अभ्यासपूर्ण बाजू मांडली. या निर्णयाने उरण तालुक्यामध्ये शिवसैनिकांनमध्ये आनंदाचा वातावरण तयार झाले आहे