सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वतीने निर्माल्य संकलन मोहीम.

जालना/प्रतिनिधी, दि 6
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ग्रीन क्लब विभागाच्या वतीने निर्माल्य संकलन मोहीम हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. रेपाळा रोड वरील तलावात सार्वजनिक गणपती व घरगुती गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाविद्यालयाच्या वतीने नैसर्गिक पाणी स्त्रोतांमध्ये सोडण्यात येणारी निर्मल, दुर्वा , हार , फुले, नारळ, नैवद्य इत्यादी साहित्य थेट तलावात विसर्जित न करता सर्व निर्माल्याचे संकलन करून ते नगरपंचायत च्या ट्रॅक्टरमध्ये टाकण्यात आले. प्राचार्य डॉ. रमेश देशमुख व ग्रीन क्लब चे समन्वयक प्राध्यापक मनीष बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी ही मोहीम यशस्वीरित्या राबविली. तलावाच्या काठावरील निर्माल्य तसेच पूजा विधी झाल्यानंतर गणेशभक्तां जवळील निर्माल्य संकलित करण्यात आले. या मोहिमेचा उद्देश नैसर्गिक जलस्त्रोत जसे नदी, तलाव या ठिकाणी जलप्रदूषण न होऊ देणे, जैवविविधतेला धोका न पोहोचवणे . मानवी आरोग्य तथा जलचर प्राण्यांचे आरोग्य संवर्धन करणे हा होता. या उपक्रमास नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज बिस्किटे,कर्मचारी कांतीलाल बंसवाल, प्रदीप राऊत , सखाभाऊ मगरे , दिलीप मगरे तथा गणेश भक्त शुभम अक्कर, बबलू जोडीवाले, दिलीप भोलाने व ग्रीन क्लबचे स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.