प्राथमिक शिक्षक संघाच्या जाफराबाद तालुका अध्यक्षपदी विनोद कळंबे
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.12
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जाफराबाद तालुका अध्यक्षपदी शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन विनोद कळंबे यांची निवड करण्यात आली. शनिवारी आयोजित शिक्षक संघाच्या तालुकास्तरीय अधिवेशनात अध्यक्षपदी श्री कळंबे तालुका नेतेपदी दीपक चव्हाण सरचिटणीस पदी सतीश राऊत कार्याध्यक्षपदी सुनील पवार, कार्यकारी अध्यक्षपदी किशोर मुरकुटे,उपाध्यक्षपदी संदीप कदम तर जिल्हा उपाध्यक्षपदी गजानन चाटे यांची निवड करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष भगवान भालके होते तर यावेळी राज्य नेते उत्तमराव वायाळ जिल्हा सरचिटणीस शांतीलाल गोरे कार्यकारी अध्यक्ष अण्णा इंगळे संपर्कप्रमुख वसंता शेवाळे, माजी तालुकाध्यक्ष दीपक चव्हाण, नारायण पिंपळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना श्री वायाळ म्हणाले की प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून वाचता गायक राज्यस्तरीय अनेक प्रश्न सोडविण्यात आलेले आहे. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भालके म्हणाले की प्राथमिक शिक्षक संघ ही राज्यातील बलाढ्य संघटना असून ही संघटना तालुक्यात अधिक बळकट करण्यासाठी आगामी काळात तालुका शाखेने प्रयत्न करावेत.यावेळी बोलताना विनोद कळंबे म्हणाले की जिल्हा शाखेने आपल्यावर टाकलेल्या जबाबदारी चे भान राखून आपल्यावरचा विश्वास कामातून सार्थ ठरवून दाखवू. यावेळी श्री गोरे श्री इंगळे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक चव्हाण यांनी तर सूत्रसंचलन रिजवान शेख यांनी केले. रिजवान शेख यांना राज्य कार्यकारिणीवर पाठविण्याचा ठराव जिल्हा संघ राज्य कार्यकारणीकडे देण्याची घोषणा यावेळी उत्तमराव वायाळ यांनी केली. जिल्हाध्यक्ष भगवान भालके आणि नवनियुक्त तालुकाध्यक्ष विनोद कळंबे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून यावेळी महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष गजानन चाटे आणि समता शिक्षक संघटनेचे संदीप कदम यांनी संघात प्रवेश केला. यावेळी संजय लोखंडे, संजय कासोद, नारायण मेरत ,अनिल पडघन,अशोक मुंढे, काशिनाथ उखर्डे,कैलास लोखंडे,आश्रुबा बुरकुल, पंकज पाटील,कौतिकराव फोलाने दीपक इंगळे, महेश अहिरे, धनंजय आढाव, भगवान शेळके, दिलीप आढे, किशोर महाजन,संदिप जाधव, विष्णू इंगळे, रमेश शेळके, दिनेश डोईफोडे, ज्ञानेश्वर शिंगणे, विश्वास वाघमारे, भगवान चव्हाण, गणेश पठाडे, ज्ञानेश्वर भालके, अनिल शिंदे,दिलीप म्हस्के, छगन जाधव,श्री मोहिते यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
