गणेश उगलमुगले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.3
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील बी द चेंज फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार निवडुंगा ता. जाफराबाद येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक गणेश उगलमुगले यांना रविवारी ता.1शिर्डी येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला.श्री उगलगमुगले हे विद्यार्थी प्रिय तंत्रस्नेही शिक्षक असून त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊ बी द चेंज फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिर्डी येथे आयोजित या समारंभास
कर्नल सुनील राजदेव, अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता पगार ,अरुण भंडारे श्रीराम थोरात यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.श्री गणेश उगलमुगले यांना सदर राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे निवडुंगा ग्रामस्थांसह विस्तार अधिकारी जिनेंद्र काळे,रामकुमार खराडे,केंद्रप्रमुख गजानन मांटे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विनोद कळंबे यांच्यासह जाफराबाद तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

