जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेला भेट

जालना/प्रतिनिधी,दि. 7
जिल्ह्याच्या नवनिर्वाचित जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेला सदिच्छा भेट दिली. भेटी दरम्यान जालना जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक मंगेश केदार आणि प्रशिक्षण संस्थेचे संचालक गिरीश सुलताने यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. पुढे जिल्हाधिकारी यांनी ब्युटी पार्लर चे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींशी संवाद साधून संस्थेविषयी समाधान व्यक्त करत आवश्यक ते बदल करण्याविषयी सूचना केल्या. महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था ही ग्रामीण भागातील 18 ते 45 या वयोगटातील महिला आणि पुरुष यांच्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविते. या भेटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही योजना पोहोचावी हा जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीमागील उद्देश होता. सदरील प्रशिक्षण केंद्र सतकर कॉम्प्लेक्स अंबड चौफुली येथे चालते आणि येथे मसाला उद्योग, शिलाई काम, फॅशन डिजाईनींग, ब्युटी पार्लर, मेन्स सलून, हाऊस वायरिंग, मोबाईल रिपेरिंग, कुकूट पालन, शेळी पालन, मशरूम लागवड, कृषी उदयमी, मेणबत्ती बनवणे, दुग्ध व्यवसाय इत्यादी विषयांवर प्रशिक्षण दिले जाते तरी इच्छु नागरिकांनी संस्थेला भेट देऊन शासकीय प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा.



