अष्टपैलू ओमराज उखर्डेची राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी संघात निवड.

टेंभुर्णी/सुनिल भाले,दि.6
श्रीमती.जे.बी.के विद्यालयाचा ओमराज कृष्णा उखर्डे” याची खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी निवड.
टेंभुर्णी शहरातील श्रीमती. जे बी के विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयाचा अष्टपैलू खेळाडू विद्यार्थी ओमराज कृष्णा उखर्डे याची 6 व्या खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डीच्या अंतिम 12 खेळाडूंच्या संघात निवड झाली असून 18 जानेवारी 2024 पासून तामिळनाडू येथे होणाऱ्या खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेत भाग घेणार आहे.
त्याच्या या यशाबद्दल नवभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. संजय काबरा, सचिव. सत्यनारायण सोनी, उपाध्यक्ष. शेख जमीर शेख सर, माजी अध्यक्ष. सुरेश काबरा, जेष्ठ संचालक. मधुकर निकम, संचालक मंडळातील. सुभाष राठी,ॲड. प्रेमसुख काबरा, प्रल्हाद टेंभुर्णीकर, विश्वनाथ सांगुळे, प्रा.दत्ताराव देशमुख, प्राचार्य/मुख्याध्यापक नंदकुमार काळे सर, उपप्राचार्य. मधुकर झटे सर, उपमुख्याध्यापक पंजाबराव सोळंके, पर्यवेक्षक धनंजय पुराने सर, माजी प्राचार्य.भास्कर चेके सर, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सखाराम बोरकर, क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक-राजेश शेवाळे, संजय कुलकर्णी,गणेश सावसक्के, रमेश इंगळे,विष्णू जाधव, एस.व्हि.कुलकर्णी, भिवसन ससाणे, दिनकर उखर्डे, समाधान कांबळे, दत्तात्रय उखर्डे, राजेंद्र जगताप, रवींद्र मोरे, वासुदेव क्षिरसागर, प्रा.सुनिल बनसोडे , डॉ.अरूण आहेर,प्रा.रामदास भांगे,प्रा.के.जी.जाधव.प्रा.गजानन धोटे.डॉ.आनंद जाधव, उज्ज्वला आवटी, एफ् ए.शेख.मंजुषा भिलावेकर, माधुरी पाटील, ज्योतीताई जाधव,विजया लंबे,सुनील सकुंडे, राजुभाऊ डोमळे, नागोराव देशमुख, दगडूबा तांबेकर, कोच सोमनाथ मघाडे,दिपक देशमुख,नसिम शेख, संजय निकम संजय राऊत,मानव सेवा मंडळ, यांनी अभिनंदन केले असुन, तामिळनाडू राज्यात
होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत घवघवीत यशासाठी ओमराज कृष्णा उखर्डे यास शुभेच्छा दिल्या आहेत.