0
3
0
4
8
9

जालना/प्रतिनिधी,दि.29
राज्यातील शेतकर्यांना शंभर टक्के कर्जमाफी देवून कायमस्वरुपी वीज बिल माफ करण्याची भूमिका राज्य सरकारने घ्यायला पाहिजे होती. मात्र, बारीकसं काही तरी करायचं आणि त्याची चर्चा अधिक करायची असा काहीसा प्रकार राज्य सरकारच्या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात दिसून आला. हा अर्थसंकल्प शेतकर्यांसह राज्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसणारा असल्याची टीका जालना लोकसभेचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी आज शनिवारी येथे बोलतांना केली.
जालना येथील अंबड चौफुली जवळील शासकीय विश्रागृहात पत्रकारांशी बोलतांना खासदार डॉ. कल्याण काळे म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीने काल शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, बेरोजगार युवक, महीला, सर्वसामान्य माणसाला काय मिळाले. इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा करण्याबरोबरच विद्यार्थ्याना सुद्धा शिक्षा कालावधीत विद्यावेतन, रोजगार देण्याचे वचन देण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने 30 ते 40 खासदार कमी पडले. राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली. राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात शेतकर्यांना शंभर टक्के कर्जमाफी देण्याचे वचन दिले होते. राज्यातील सरकारने काय दिले असा खडा सवाल उपस्थित करून शेतकर्यांना लागणार्या शेती अवजारावरील जीएसटी माफ केला नाही. कुठं तरी 2 हजार रुपये द्यायचे आणि त्यात सरकारने हजार दोन हजार रुपये टाकायचे. तेही कुणाला मिळतात, कुणाला मिळत नाही यामुळे शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत. राज्य सरकारने खरं तर शेतकर्यांना शंभर टक्के कर्जमाफी करायला पाहिजे होती आणि शेतकर्यांना लागणार्या अवजारावर शंभर टक्के जीएसटी माफ करायची भूमिका घेणे गरजेचे होते. खासदार डॉ. कल्याण काळे यांनी शेतकर्यांना करण्यात आलेल्या वीज बिल माफीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला चांगलेच फैलावर घेतले. मागील दहा वर्षापासून मराठवाड्यासह राज्यातील बहुतांशी भागातील शेतकरी दुष्काळाला तोंड देत आहे. कोणत्या शेतकर्यांनी मोटर चालवल्या ? शेतकर्यांच्या मोटरी बंद आहेत. जालना जिल्ह्यात बागायत आहे का ? असे प्रश्न उपस्थित करत खा. डॉ. कल्याण काळे म्हणाले की, ज्या भागात शंभर टक्के बागायत आहे अशा भागातील शेतकर्यांनाच या निर्णयाचा लाभ होणार असल्याचे स्पष्ट करून जालना जिल्ह्यातील शेतकर्यांना या वीज बिल माफीचा कोणताही लाभ होणार नसल्याचे ते म्हणाले. काल शुक्रवारी राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्रातील जनतेच्या तोंडाला पाने पुसणारा आणि नुसती फसवणूक करणारा तसेच येणार्या विधानसभा निवडणुकी पुरता वाटलेले चॉकलेट असल्याची टीका केली. राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारने आत्मविश्वास गमावलेला असून येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे म्हणून मरता वो क्या नही करता असला हा प्रकार असून राज्यातील शेतकरी, तरुण बेरोजगार आणि ज्या ज्या समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवलेले समाज येणार्या विधानसभा निवडणुकीत त्यांची सोय पाहिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देखील खासदार डॉ. कल्याण काळे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
3
0
4
8
9