महायुतीचे उमेदवार महेश बालदी यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून आणण्याचा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा निर्धार.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.26
उरण तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे उरण पूर्व विभाग मध्ये आवरे,पाले,पिरकोण,सारडे येथील बूथ वर युवा मोर्चाची बैठक संपन्न झाली .यावेळेस उरण तालुका युवा मोर्चा अध्यक्ष तेजस पाटील,उरण पूर्व विभाग युवा मोर्चा अध्यक्ष प्रविण घासे,
उरण तालुका सचिव ॲड.साहिल हेमंत म्हात्रे, उरण तालुका सोशल मीडिया अध्यक्ष समीर पाटील,आवरे पंचायत गण अध्यक्ष पंकेश म्हात्रे उपस्थित होते. या वेळेस युवकांना व उपस्थितांना सर्व युवा नेत्यांनी संबोधीत केले व निवडणुकीत जास्तीत जास्त काम करण्यास प्रेरीत केले.मुकुंद गावंड,जीवन गावंड,रोशन पाटील, अजित पाटील, अमित म्हात्रे, पंकज म्हात्रे, धनेश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी महायुतीचे उमेदवार महेशशेठ बालदी यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून आणण्याचा निश्चय यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला आहे.