नाटके सादर करण्यात सातत्य ठेवणारे उरण तालुक्यातील गाव कुंडेगाव !. – रायगडभूषण प्रा एल बी पाटील

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21
मागील ३० / ४० वर्षांपूर्वी उरण तालुक्यातील काही गावांना दर वर्षी एक किंवा तीनचार नाटकेही सादर होत असत परंतु त्यानंतर या सादरीकरणात खंड पडत गेला, काही गावात नाटकांचे सादरीकरण थांबले आहे. मात्र मागील सत्तर वर्षां पैकी ५/६ वर्षे सोडल्यास कुंडेगाव हे गाव सातत्याने नाटक सादर करणारे गाव आहे, असा विचार ज्येष्ठ साहित्यिक रायगड भूषण प्रा.एल. बी.पाटील यांनी उरण कुंडेगाव येथे नाटकाच्या उदघाटन प्रसंगी मांडले .नाटकाचे उद्घाटन सुनंदा लक्ष्मण पाटील यांच्या शुभहस्ते झाले.ग्रा.पं.सदस्या रंजना भोईर,कुंडेगाव अध्यक्ष अजय कुंडेगावकर, लोककलाकार दत्ता भोईर,प्रमोद ठाकूर, नाटककार किशोर पाटील, मच्छिंद्र म्हात्रे, अनिल भोईर, प्रमोद पाटील, नितीन मढवी, नासिकेत म्हात्रे, कृष्णा गोवठणेकर,चंद्रविलास घरत इत्यादी तालुक्यातील प्रतिष्ठित आणि कलाकारांची यावेळी आवर्जून उपस्थिती होती.
या नाटकाचे लेखन भरत पाटील, दिग्दर्शन राजेंद्र चोगले, राजेश पाटील, रंगभूषा अमृत म्हात्रे, प्रकाश योजना, संगीत मोहन भोईर,दिलीप पाटील, ध्वनी धृव म्हात्रे इत्यादींनी नाटक यशस्वी करण्यासाठी आपली कामगिरी चोख बजावली.
कलाकार भरत पाटील,राजेश पाटील, राजेंद्र चोगले,सुदर्शन भोईर,जयवंत पाटील,राजेंद्र पाटील,शौर्य पाटील,रुपये मढवी,अन्विता पाटील,प्रज्ञा म्हात्रे, वैशाली मोहिते या सर्व कसलेल्या कलाकारांनी साजेशी अभिनय सादर करून रसिक प्रेषकांची मने जिंकली आहेत.गाव कलाकारांचे सुंदर नाटक परिसरातील प्रेक्षकांना यावेळी पहावयास मिळाले.