pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षणासाठी अर्ज करावेत

0 1 1 8 2 2

जालना/प्रतिनिधी,दि. 18

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांमार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील धनगर व उपजातीमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त दत्तात्रय वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जालना जिल्ह्यातील मानेगांव येथील यशवंती इंग्लिश स्कुल आणि भोकरदन येथील रेडीयंट इंग्लिश स्कुल या शाळेची निवड करण्यात आली आहे. शासनाने वेळोवेळी घोषीत केलेल्या धनगर व त्यांच्या उपजाती या मधील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सर्व सोयी – सुविधा मोफत उपलब्ध असून या शाळेत या योजनेंतर्गत अर्ज तात्काळ करणे आवश्यक आहे. प्रवेश घेण्याकरिता मान्यता मिळालेल्या सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना भेट देऊन अर्ज सादर करावेत तसेच समाजकल्याण, जालना या कार्यालयास भेट देऊन अर्ज उपलब्ध करुन घ्यावेत.

विद्यार्थी  प्रवेशासाठी धनगर व त्यांच्या उपजाती मधील असावा व त्याच्याकडे जात प्रमाणपत्र असावे.  शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता पहिली ते पाचवी वर्गात प्रवेशित असावा.  इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घ्यावयाचा असल्यास जन्माचा दाखला असणे आवश्यक राहील.  प्रवेशासाठी पाल्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापर्यंत  मागील आर्थिक वर्षामधील असणे आवश्यक आहे. असे समाज कल्याण विभागाकडून  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2