गोवठणे गावातील रस्त्याच्या कामाचे दमदार आमदार महेशजी बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली भूमिपूजन

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14
उरण तालुक्यातील गोवठणे गावातील रस्त्याचे काम व्हावे यासाठी राणीताई सुरज म्हात्रे यांनी दमदार आमदार महेशशेठ बालदी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.गोवठणे नागरीकांसमोरील समस्या सोडविण्यासाठी आमदार महेश बालदी यांनी लाखोंचा निधी मंजूर केला.त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर यांनी रस्ता रूंदीकरण व कॉंक्रीटीकरण या विकासकामांचे भूमिपूजन श्रीफळ वाढवून केले.यावेळी नागरिकांना दिलेल्या शब्दांची आमदारांनी वचनपूर्ती केल्याने गोवठणे गावातील नागरिकांनी पुष्पगुच्छ देवून रवीशेठ भोईर यांचे आभार मानले.या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, कॉन्ट्रॅक्टर देवेंद्र पाटील, मयूर घरत,धनेश गावंड तसेच पुनाडे सदस्य रसिक पाटील,सारडे सदस्य भार्गव म्हात्रे, अश्विन म्हात्रे, मार्गदर्शक संतोष वर्तक, कार्याध्यक्ष सूरज म्हात्रे, उपसरपंच कविता म्हात्रे,सदस्य प्राची पाटील, संतोष वर्तक,शाखाध्यक्ष रोशन म्हात्रे, युवा अध्यक्ष सिद्धेश म्हात्रे, माजी उपसरपंच विक्रांत वर्तक, माजी सदस्य स्मिता म्हात्रे यादव व यशवंत वर्तक,हर्षद म्हात्रे,प्रीतम वर्तक,विद्यानंद म्हात्रे, समाधान वर्तक, कल्पना वर्तक, रेणुका म्हात्रे, उषा पाटील, साक्षी म्हात्रे, संगीता म्हात्रे, सुरेंद्र पाटील, प्रविण पाटील, प्रेम पाटील, निर्णय पाटील हे मान्यवर व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.