बसंत पंचमी उत्सव मंडळ ट्रस्ट तर्फे वसंत पंचमी उत्साहात साजरी

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.15
वसंत पंचमी ही शिशिर ऋतू मध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतुंचा राजा असेही मानले जाते. त्याचा स्वागत करण्याचा वसंत पंचमी हा विशेष दिवस असतो. अनेकजण विविध धार्मिक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून माता सरस्वतीचे पूजन करून या ऋतूचे स्वागत करतात.उरण तालुक्यात बसंत पंचमी उत्सव मंडळ ट्रस्ट तर्फे श्री विठ्ठल मंदिर, देऊळवाडी, उरण शहर येथे विविध उपक्रम, कार्यक्रम राबवून बसंत पंचमी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी देवीची प्राणप्रतिष्ठा, दुपारी महाप्रसाद, भजन, रात्री गायन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सप्तसूर संगीत दरबार तर्फे गायिका जयश्री पुजारी यांनी तसेच हार्मोनियम गोपाळ पाटील,तबला वादक संतोष खरे, टाळ वादक सुरेश पुजारी यांनी धार्मिक गिते गाऊन सर्वांची मने जिंकली.या वेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, शिवसेना नेते कमळाकर पाटील, कामगार नेते मधुकर पाटील, भारतीय मजदूर संघांचे अध्यक्ष लोकेश म्हात्रे,वैष्णवी मित्र मंडळचे उपाध्यक्ष गुड्डू यादव,एकविरा सामाजिक संस्था मोरा उरणचे अध्यक्ष राजेश कोळी आदी विविध प्रतिष्ठित मान्यवरांनी कार्यक्रम स्थळी हजर राहून माता सरस्वती देवीचे दर्शन घेउन सर्वांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या.विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमती आशा पारेख, पंडित प्रदीप महाराज यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमाला लाभले.सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसंत पंचमी उत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष- अमर श्रीवास्तव, सचिव- ए. के. सिंह, महासचिव -रंजन कुमार,पेट्रोन – आर पी मिश्रा, कुष्णा कोठारी, राजेश विश्वकर्मा, एस एन रॉय, उपसचिव -कामेश्वर शर्मा, मनोज शर्मा, चेअरमन -दिनेश जयसवाल, खजिनदार -राकेसकुमार तसेच मंडळ (ट्रस्ट )च्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर (खरेतर २१ डिसेंबरनंतर) सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता – सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे.वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे. विद्येची देवता स्वरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते. वसंत पंचमी साजरी करण्याला हिंदू धर्मात अनेक मान्यता आहेत. वसंत पंचमीच्या दिवशी विद्येच्या साधनेमध्ये कोणतेही अडचण येऊ नये यासाठी सरस्वती देवीची आराधना केली जाते अशी माहिती बसंत पंचमी उत्सव मंडळ ट्रस्टचे महासचिव रंजन यांनी दिली.