डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ जालना भाजपचं आव्हाडांविरोधात आंदोलन

जालना/प्रतिनिधी,दि.30
महाड येथील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जाहीरपणे अवमान केल्याच्या निषेधार्थ भाजपा व मित्रपक्ष जितेंद्र आव्हाडांविरोधात राज्यभर आंदोलनं करीत आहे. जालना भाजपच्यावतीने सुद्धा जितेंद्र आव्हाडांच्या या दुष्कर्माचा जाहीर निषेध करण्यात आला.
या घटनेच्या निषेधार्थ भाजपा जालना यांच्या वतीने जालना शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, राजेशजी राउत, संध्याताई देठे यांच्या उपस्थितीत जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले व जाहीर निषेध आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, जालना विधानसभा प्रमुख भास्कर (आबा) दानवे, भाजपा महानगर अध्यक्ष आशोक आण्णा पांगारकर, अतिक खान, सोपान पेंढाकर, संतोष लोखंडे, सुनील खरे, रामलाल चव्हाण, शिवराज जाधव, अर्जुन गेही, महेंद्र अकोले, राजेंद्र भोसले, दुर्गेश कुरील, पांडुरंग पोहेकर, रोशन चौधरी, तुलजेश चौधरी, शुभांगीताई देशपांडे, अरुणा जाधव, वंदना ढगे, दिपाली बिन्नीवाले, मीना गायकवाड, डोंगरसिंग साबळे, शेखर बुंदिले, सय्यद इम्रान, सतीशचंद्र प्रभू, सोमेश काबलीये, अनिल सरकटे, नानासाहेब देव्हडे, सतीश अकोलकर, माणिक फड, जुनेद मिर्झा, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.