साक्षात अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात अध्यात्मिक वातावरणात विवाह सोहळा संपन्न

छ. संभाजीनगर /आनिल वाढोणकर,दि.15
छत्रपती संभाजीनगर येथील कलादालन मंगल कार्यालय अशोक नगर येथे खाडे परिवार व कवळे परिवार यांच्या विवाह सोहळ्यास असं म्हणतात की भक्ती ही हृदयापासून मनापासून असली तर साक्षात परब्रह्म सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा असतो असाच अद्भुत प्रत्यक्ष ना भूतो ना भविष्यती श्री प्रमोद जी खाडे यांची कन्या चि सौ का पल्लवी आणि वर चि.आकाश यांच्या विवाह सोहळ्यात सुंदरक्षणी अचानक ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्ष स्वरूपात शुभाशीर्वाद देण्यास अवतरले व अवघे लग्न सोहळ्यांचे मंगलमय वातावरण आध्यात्मिक झाले यावेळी संपूर्ण नातेवाईक आप्तेष्ट मित्र परिवार मंडळी यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले प्रत्यक्ष स्वामींनी दर्शन दिल्यानंतर विवाह सोहळा अगदी उत्साहात पार पडला यावेळी हभप पवन महाराज खाडे यांनी आपल्या जीवनातील अध्यात्माचे महत्व आणि आई-वडिलांमधील देव यावर भाष्य करून सर्वांचे मन जिंकली विवाह दरम्यान प्रमोदजी खाडे व राजेंद्रजी कवळे यांच्या परिवाराकडून अनंत कोटी ब्रम्हांडनायक स्वामी समर्थ महाराज यांची आरती करून विवाहांचा कार्यक्रम उत्साहात सुंदर रित्या संपन्न झाला



