भारतीय जनता पार्टीच्या जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवार, दि. ०४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता बडी सडक येथील प्रभू श्रीराम मंदिरात शंखनाद करून तसेच माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात येणार आहे.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आ. श्री. बबनराव लोणीकर, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. श्री. नारायण कुचे, आ. श्री. संतोष पाटील दानवे, महानगरपालिका निवडणूक प्रमुख व माजी आमदार श्री. कैलाश शेठ गोरंट्याल, महानगर जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे, माजी जिल्हाध्यक्ष श्री. रामेश्वर पाटील भांदर्गे यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तसेच प्रदेश निमंत्रित सदस्य श्री. राजेश राऊत, श्री. विजय कांबळे, श्री. अशोक अण्णा पांगरकर, विमलताई आगलावे तसेच महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष श्रीमती शुभांगीताई देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
महानगरपालिका निवडणुकीत जालना शहराचा सर्वांगीण विकास, सक्षम प्रशासन व पारदर्शक कारभार या मुद्द्यांवर भाजप निवडणूक रिंगणात उतरली असून, आगामी काळात जनतेपर्यंत विकासाचा अजेंडा पोहोचवण्यासाठी व्यापक प्रचार मोहिम राबविण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर जालना महानगरातील भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी महानगर जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.
गोदावरी नदीच्या महापुरामुळे बाधित शेतकऱ्यांना पिकविमा आणि नुकसान भरपाई मिळण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
2 days ago
अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी
2 days ago
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा जालना जिल्हा दौरा
2 days ago
शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडीबीटी 2.0 पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
2 days ago
राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे
2 days ago
उरणमध्ये राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाची पर्वणी;
2 days ago
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ.
2 days ago
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा.
2 days ago
उरण महाविद्यालयात जपानी भाषा प्रशिक्षणाची सुरुवात.
3 days ago
शासकीय वसतिगृहात व्यावसायीक विभागाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन