दिव्यांगाच्या दारी शासन कार्यक्रमापुर्वी दिव्यांगाच्या विविध मागण्या पुर्ण करा – समीर पटेल

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.20
दिव्यांगाच्या दारी शासन अभियानापुर्वी दिव्यांगाच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत. त्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान पुर्वी मागण्या पुर्ण करण्यात यावे. याकरीता दिव्यांग विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष समीर पटेल यांनी स्थानिक व जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
व त्या मागणी निवेदनावर दिव्यांगाच्या दारी शासन अभियानात होणारा खर्च हा पाच टक्के दिव्यांग निधीतुन करण्यात येऊ नये. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगाचे सर्वेक्षण दिव्यांगाच्या घरी जाऊन करून, दिव्यांगाची सर्व माहिती गुगल शिटवर ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करावी. दिव्यांगाला दिव्यांग विभाग दिव्यांगाच्या दारी कार्यक्रमात सहभागी साठी दिव्यांगाला त्यांना गावातुन नेणे आणणे, चहा पाणी, नाष्टा व जेवणाची आणि त्यांच्या स्वागताची चांगल्या प्रकारे व्यवस्था करावी. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानात दिव्यांगाची कसल्याही प्रकारे हेडसाळ होणार नाही. यांची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. दिव्यांगाला महाराष्ट्र राज्य परिवहन एस.टी. बसचा प्रवास मोफत देण्यात यावा. दिव्यांग व्यक्तीला शासन निर्णय दिनांक 21 डिसेंबर 2020 रोजी नुसार दिव्यांगाला अंत्योदय योजनेत त्वरित लाभ द्यावा. दिव्यांगाला ग्राम पंचायत, नगर पंचायत, नगर परिषद आणि महा नगर पालिकेतील पाच टक्के दिव्यांग निधी तात्काळ देण्यात यावा. शासकीय व निम शासकीय कार्यालयात व कार्यालयीन परिसरात दिव्यांगाला स्वयंरोजगार करिता 200 स्क्वेअर फुट जागा आणि ग्राम पंचायत, नगर पंचायत, नगर परिषद, महा नगर पालिका हद्दीतील बांधकाम गाळयात दिव्यांगाला व्यवसाय करिता गाळे देण्यात यावे. संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांगाचे मासिक अनुदान पंधराशे रुपये प्रमाणे दर महिन्याला पहिल्या आठवड्यात देण्यात यावे. व तसेच संजय गांधी निराधार योजनेची बैठक झाल्यास त्या दिवशी पात्र व अपात्र याद्या लावावे. दिव्यांगाचे प्रत्येक कार्यालयातील व विभागातील प्रलंबित कामे तात्काळ पुर्ण करावे. हे वरील विविध दिव्यांगाच्या मागण्या आहेत. ते दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान पुर्वी तात्काळ मान्य करावी. ज्यांनी करून दिव्यांगाला खऱ्या योजनेचा लाभ मिळेल. अशी मागणी दिव्यांग विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष समीर पटेल यांनी केले आहेत. त्यांच्या सोबत जमीर पटेल, अजिंक्य अशोक चव्हाण, फारुक कुरेशी, शेख अहमद भाई, कुबेर राठोड, शेख इमरान, दिपक सुर्यवंशी, शेख सलीम, रमेश गोडबोले, शेख सजित, गजानन शिंगणे, सुलताना कुरेशी, धुरपत सूर्यवंशी, मारुती लांडगे, गजानन पऊळ आदीसह यावेळी उपस्थित होते….