pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

स्त्री शक्ती फाउंडेशन च्या गणपती बनविण्याच्या कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद

0 3 8 3 5 2

पुणे/आत्माराम ढेकळे,दि.21

पुणे –पिंपरी -चिंचवड येथील ‘स्त्री शक्ती फाउंडेशन संचलित अध्यात्मिक गजानन बाल संस्कार केंद्र तर्फे आयोजित एकदिवशीय निःशुल्क आॕनलाईन शाडुच्या माती पासुन (इको फ्रेंडली )गणपती बनविण्याची कार्यशाळा उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न झाली.
दरवर्ष्री प्रमामाणे याही वर्षी स्त्री शक्ती फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सौ.अर्चना ईश्वर सोनार यांनी लहान मुलांसाठी शाडुच्या मातीपासुन गणपती कसे बनवितात .याबाबतीत आॕनलाईन कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यशाळेस प्रामुख्याने मार्गदर्शक म्हणून सुवर्णवार्ता रुग्वेद न्युज चॕनेलचे संचालक दिनेश येवले ,पत्रकार आत्माराम ढेकळे ,सोनार सेवा महासंघ,पुणे संघटक नारायण उदावंत ,विश्वकर्मा युवा फाउंडेशन ,पुणे चे अध्यक्ष आकाश पिनप्रतिवार (पांचाळ) हे उपस्थित होते. कार्यशाळेत प्रशिक्षक सार्थक कर्णे व समर्थ कर्णे या दोन मुलांनी शाडुची माती कशी भिजवावी व गणपती कसे तयार करावेत ,यासाठी लागणारे साहित्य , कलर डेकोरेशन पासुन सर्व बाबी छान समजावुन सांगितल्या. मार्गदर्शन करीत असतांना प्रात्यक्षिक मध्ये लालबागचा राजा प्रतिकृती गणपती मुर्ती बनविली.याबद्दल सर्वांनी त्याचे कौतुक कैले. या कार्यशाळेच्या आयोजिका अर्चना सोनार यांचे विविध सामाजिक उपक्रम महिला व लहान मुलांसाठी असतात .मुलांच्या सुप्त गुणाचा विकास करण्यासाठी कार्यशाळा,शिबिराचे आयोजन उत्कृष्ट करतात .त्यांच्या कार्याचा आढावा मान्यवर मार्गदर्शक यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करुन अभिनंदन केले. या आॕनलाईन कार्यशाळेत संपुर्ण महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.आयोजकांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे