pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 75 उमेदवारांची निवड

0 4 0 8 5 3
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.23

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जालना अणि मोरेश्वर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, भोकरदन जि. जालना यांचे संयुक्त विद्यमाने मंगळवार] दि 22 जुलै, 2025 रोजी मोरेश्वर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भोकरदन जि. जालना येथे “पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा “संपन्न झाला. या रोजगार मेळाव्यात एकुण 259  उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 144 उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीस सहभागी झाले होते. यामध्ये 121  पुरुष तर 23 महिलांचा समावेश आहे. या रोजगार मेळाव्यात परीसरातील एकुण 75 उमेदवारांची विविध पदांसाठी आस्थापनांव्दारे प्राथमिक निवड करण्यात आली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर व जालना येथील एकुण 12 नियोक्ते उपस्थित होते यामध्ये 67 पुरुष व 8 महिला असे एकुण 75 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली.

तसेच या मेळाव्यात शासनाच्या जिल्हास्तरावरील विविध महामंडळे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रसंगी स्वयंरोजगाराबाबत अर्थसहाय्य करणाऱ्या विविध शासकीय महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले, यामध्ये शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत 8 लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोकरदन विधानसभा सदस्य आ. संतोष दानवे उपस्थित होते. यावेळी मंचावर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर, भुजंग रिठे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवान डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यास परीसरातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांनी केले.

या रोजगार मेळाव्याच्या यशस्वीवेतसाठी अमोल बोरकर, आत्माराम दळवी, डॉ. अमोल परिहार, प्रदीप डोळे, रवि पाडमुख, विशाल जगरवाल, उमेश कोल्हे, दिनेश उढाण, सोमेश्वर शिंदे, अमर तुपे, दिपक पालवे यांनी परीश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमास मोरेश्वर महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. गोवर्धन मुळक यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. भगवान डोंगरे यांनी केले.

 

 

 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 5 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे