pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

प्रत्येकानी महापुरुषाचे विचार आचरणात आणावे डॉ. अंकुशराव देवसरकर

0 1 1 8 3 4

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.16

हदगाव तालुक्यासह बरडशेवाळा कवाना बामणी फाटा पिंपरखेड पळसा मनाठा माळ सावरगांव माळझरा कार्ला चोरंबा खरबी केदारनाथ कुसळवाडी बुधवार पंधरा नोव्हेबर रोजी क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जंयती विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.जन्मभुमीतुन प्राथमिक शिक्षक घेऊन आज सर्वाधिक विविध पदावर अधिकारी कर्मचारी असलेले गाव म्हणून ओळख असलेल्या आदिवास भागातील माळझरा येथे जंयतीनिमीत्य कब्बडीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . जंयतीनिमीत्य उपस्थित नांदेड येथील सुप्रसिद्ध भगवती हॉस्पीटल चे संचालक डॉक्टर अंकुशराव देवसरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सध्याची परीस्थीती लक्षात घेता सर्वानी महापुरुषाचे विचार आचरणात आणावे असे आवाहन केले.
यावेळी हिंगोली काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देसाई , शेख सलीम भाई कळमनुरी, माळझरा येथील भूमिपुत्र पोलीस निरीक्षक मेंडके, बिट जमादार दत्तात्रय गिरी , सरपंच पंडीत खोकले, उपसरपंच संजय क-हाळे , तंटामुक्त समीती अध्यक्ष प्रभाकर मिराशे , गुलाबराव हाके , संतोषराव बुरकुले सर ,शंकरराव मिराशे, दत्ता मेंडके , चिंचगव्हान माजी सरपंच नारायणराव नाईक, सरपंच संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष अनील पवार करमोडीकर, पप्पु चव्हाण उचांडकर , आनंदराव मस्के , भगवानराव कदम वाळकीकर, दिनेश दहिभाते , सुभाषराव नरोटे , यांच्यासह माळझरा गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक मंडळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4