चिमुकल्या विद्यार्थ्यांचा रस्ता एका दिवसात सतीश घाटगेनी केला तयार
देवडी हादगावातील मुलांची गैरसोय दूर : ‘समृद्धी’कडून स्वखर्चातून काम
जालना/प्रतिनिधी, दि.10
घनसावंगी : तालुक्यातील देवडी हादगाव येथील जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता अनेक वर्षापासून नादुरुस्त आहे. शाळकरी मुलांचे चिखलातून जातानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. तसेच एका विद्यार्थ्याने सतीश घाटगे यांना फोन करून रस्ता दुरुस्त करून देण्याची विनंती केली होती. गरीब विद्यार्थ्यासाठी सतीश घाटगे यांनी एका दिवसात शाळेचा रस्ता तयार करून दिला. यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी सतीश घाटगे यांचे आभार मानले.
दोन दिवसापूर्वी भाजपा नेते सतीश घाटगे यांना शाळेतील मुलाने फोन करून आमच्या शाळेचा रस्ता करून द्या अशी विनवणी केली होती. त्या मुलाचा वेदनेने भरलेला आवाज ऐकून सतीश घाटगे यांनी काही तासात देवडी हादगावात येऊन शाळेला भेट दिली. रस्त्याची अवस्था बघितली. लहान मुलांचे शाळेत येताना होणारे हाल पाहून सतीश घाटगे यांनी त्वरित या रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरती व्यवस्था करण्याचे आदेश समृद्धी कारखान्याच्या यंत्रणेला दिले. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी हा रस्ता दुरुस्त झाला. आणि शाळकरी मुलांची गैरसोय थांबली. या मदतीबद्दल सतीश घाटगे यांचे गावकऱ्यांनी आभार मानले. हा रस्ता पावसाळा संपताच सिमेंट कॉंक्रीटने तयार करून देण्याचा शब्द गावच्या जनतेला सतीश घाटगे यांनी दिला आहे.
——————————————————-
गरीब मुलांच्या शिक्षणात रस्त्याचा अडथळा असणे म्हणजे ही दुर्दैवाची बाब आहे. लहान मुलांचे हाल होऊ नये तसेच त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून नैतिक जबाबदारी म्हणून हा रस्ता समृद्धी कारखान्यामार्फत करून दिला. पुढे हा रस्ता सिमेंट कॉंक्रीटने तयार करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
सतीश घाटगे, चेअरमन समृद्धी शुगर्स लि.
——————————————————–
अनेक वर्ष हा रस्ता दुरुस्त करून देण्यासाठी आम्ही ग्रामपंचायती कडे मागणी करत होतो. पण त्याचा फायदा झाला नाही. सतीश घाटगे साहेबांनी मागणी न करता मुलांचे हाल पाहून एका दिवसात रस्ता तयार करून दिला. आम्ही त्यांचे उपकार विसरणार नाही.
संग्राम देवडे, पालक