pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्ह्यात १५ ‘आपला दवाखाना’ महाराष्ट्र दिनापासून नागरिकांच्या सेवेत

0 1 7 2 6 3

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.28

आता १ मेपासून महापालिका आणि सर्व तालुक्यांच्या ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू होत असून, तिथे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या चाचण्यांची सेवा मोफत मिळणार आहे. त्यामुळे घाटी हॉस्पिटल किंवा सरकारी रुग्णालयांच्या रांगेत तासन्तास उभे राहण्याची चिंता सोडा.राज्यात असे ७०० दवाखाने सुरू करण्यात येणार असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २९ दवाखाने असतील. शहरातील झोपडपट्टी परिसर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना छोट्या- छोट्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये जावे लागते. त्यामुळे अनेकदा उपचाराला उशीर होतो, शिवाय प्रवासाचा खर्च होतो. राहण्याची गैरसोयसुद्धा होते. दुसरीकडे दैनंदिन रुग्णांमुळे घाटीसारख्या सरकारी हॉस्पिटलवर ताण वाढतो. ज्याचा थेट परिणाम अपघात विभाग, आयसीयू आणि प्रसूती विभाग, अशा तात्काळ उपचाराची गरज असलेल्या रुग्णांवर होतो. हे टाळण्यासाठी ‘आपला दवाखाना’ सुरू केला जात आहे.आपला दवाखाना’ ही योजना जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी १५, महापालिका क्षेत्रात १२ आणि छावणी परिसरात २, अशा एकूण २९ ठिकाणी राबविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १ मेपासून १४ दवाखाने यात महापालिका क्षेत्रात ५ आणि ग्रामीण भागात ८ दवाखाने सुरू केेले जाणार आहेत.या दवाखान्यांमध्ये बाह्यरुग्ण विभाग असणार आहे. येथे दररोज रुग्ण तपासणी केली जाणार आहे, तसेच असांसर्गिक रोग नियंत्रण कार्यक्रम, लसीकरण, माता बाल संगोपन कार्यक्रमात येणाऱ्या रोगांवर उपचार केले जातील. रक्त, लघवी यांसारख्या तपासण्याही येथे केल्या जातील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 2 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे