जागतीक मधमाशा दिनी पुरस्कार वितरण सोहळ्याचे 20 मे रोजी आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.8
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाबळेश्वर जिल्हा सातारा येथे दि. 20 मे, 2025 रोजी मधमाशी दिनाचे औचित्य साधुन मधमाशा पालन उद्योगामध्ये उत्कृष्ठ काम केलेल्या लाभार्थींस मधमाशी मित्र पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. मंडळाचे मध संचानालय महाबळेश्वर येथे पुरस्कार वितरण सोहळा दि. 20 मे, 2025 रोजी आयोजित करण्यात आले आहे. तेव्हा मधमाशा उद्योगामध्ये सातेरी, मालीफेरा व आग्या मधमाशांचे संगोपन करुन मधाचे उत्पादन घेणाऱ्या व्यक्ती/संस्था कडून पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार असून, याकरीता अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी इच्छूक व्यक्ती/संस्थानी जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मराठा पार्क ईमारत, दुसरा मजला, विशाल कॉर्नर, छ. संभाजीनगर चौफुली, जालना या ठिकाणी अर्जासाठी संपर्क साधावा. तसेच आपले अर्ज दि. 14 मे 2025 पर्यंत कार्यालयास सादर करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जालना यांचे द्वारे करण्यात आले आहे.
तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बी.के. वाघमारे, जेष्ठ पर्यवेक्षक व्ही.एन. कायंदे, आणि मधुक्षेत्रिक एस.पी. बगाडे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मराठा पार्क इमारत, दुसरा मजला, विशाल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर चौफुली, जालना मोबाईल नं. 9850743284 / 8788730308 / 9822528534 यांच्याशी संपर्क साधवा.