समृध्दी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आरोग्य आशा सेविका यांच्या मुलीच्या लग्नासाठी वैशाली घाटगे यांच्या हस्ते २१ हजार रुपयांचे कन्यादान…!

वडीगोद्री/तनवीर बागवान, दि.24
जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील समृद्धी शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्याने आशा वर्कर्स,अंगणवाडी सेविका,मदतनिस यांच्या मुलींच्या लग्नासाठी पुढाकार घेतला आहे.आशा वर्कर्स,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या कुटुंबातील एका मुलीच्या लग्नासाठी थेट २१ हजारांची रक्कम लग्नासाठी मदत म्हणून दिली जात आहे.
समृद्धी शुगर इंडस्ट्रीज आणि समृद्धी चॅरिटेबेल ट्रस्ट यांच्या वतीने ही मदत दिली जाणार असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन सतिष घाटगे पाटील आणि त्यांच्या पत्नी वैशाली घाटगे यांनी केली होती.या निर्णयाची कारखान्याने अंमलबजावणी देखील केली आहे.या निर्णयामुळे आशा सेविका,अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यात समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे.केवळ बंधुत्वाच्या नात्याने ही मदत करत असल्याचं चेअरमन सतिष घाटगे यांनी सांगितलं आहे.
अशाच प्रकारची मदत वैशाली घाटगे यांनी अंबड तालुक्यातील गोरी येथील लता आणि रंगनाथ खंडागळे व दुनगाव येथील आशा मंडलिक यांच्या मुलीच्या लग्नात स्वतः जाऊन केली.यावेळी लता खंडागळे यांनी आम्हाला कुणीही अशी मदत केली नाही.या मदतीमुळे खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
घनसावंगी विधानसभा मतदासंघातील घनसावंगी तालुक्यातील प्रत्येक गावात तसेच जालना तालुक्यातील ४२,अंबड तालुक्यातील ५४ गावातील आशा सेविका,अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना ही मदत दिली जात आहे.
याआधीही समृद्धी शुगर इंडस्ट्रीजने साखर कारखान्याच्या सभासदांच्या घरी लग्न असल्यास एक क्विंटल साखर मोफत देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.हा उपक्रम देखील सुरूच राहणार असून गावपातळीवर राष्ट्रीय योजनांचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या आशा सेविका,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांचं मानधन अत्यंत कमी आहे.त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात थोडा सहभाग असावा म्हणून हा निर्णय घेतला आहे.अशी माहिती समृद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा वैशाली घाटगे यांनी म्हटलं आहे.